प्रजाशिल्प
search

राष्ट्रीय जलदिनाचा मुद्दा राज्यसभेत मांडावे !

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

राष्ट्रीय जलदिनाचा मुद्दा राज्यसभेत मांडावे !

खा. संजय राऊत यांच्याकडे महेंद्र पिंपळगावकर यांची मागणी

Prajashilp digital,

नांदेड - महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष असून 20 मार्च राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करावा ही मागणी राज्यसभेत उचलून धरावी अशी मागणी या आंदोलनाचे प्रणेते महेंद्र पिंपळगावकर यांनी शिवसेनेचे फायर ब्रँण्ड नेते, राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन केली. खा. राऊत यांनी देखील या मागणीचे कौतुक करुन नक्कीच यावर अभ्यास करु असे आश्वासन दिले.

शेत

दरम्यान, ही मागणी व आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून महेंद्र पिंपळगावकर करीत आहेत.सर्व समाजातील नेते पुढारी राजकीय प्रभृती यांच्याकडे निवेदनाद्वारे वारंवार मागणी केली आहे प्रत्येकानी या मागणीचे कौतुक करीत हे आंदोलन व ही मागणी पूर्णत्वास नेण्याचे अभिवचनही देण्यात आले आहे.

महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष असून 20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करावा अशी मागणी राज्य व केंद्रस्तरावर मागील तीन वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे. महामहीम राष्ट्रपतींना याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे. तसेच राजकारणातील दिग्गज नेते खा. शरद पवार, खा. असदुद्दीन ओवेसी, केंद्रीय मंत्री चिराग पासवान, सामाजिक न्यायमंत्री खा. रामदास आठवले, खा.प्रा. ज्योतीताई वाघमारे तसेच राज्यातील वेगवेगळ्या खात्याचे मंत्री तथा वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांची भेटी घेऊन राष्ट्रीय जलदिनाची मागणी करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी हा विषय देशाच्या सर्वोच्च सभागृहात मांडण्याचे आश्वासन दिलेले आहे. याबाबत लवकरच त्यांना स्मरणपत्रे देखील पाठविण्यात येणार आहेत. विविध सभा, संमेलने, धम्म परिषदा आदी वेगवेगळ्या स्तरावर राष्ट्रीय जलदिनाच्या मागणीचा ठराव घेण्यात येत आहे. समाजाच्या सर्वच स्तरातून या मागणीस मोठा पाठिंबा मिळत आहे.

parlor

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत आज नांदेड दौर्‍यावर आले असता महेंद्र पिंपळगावकर यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत त्यांची भेट घेऊन आपले सविस्तर निवेदन सादर केले. खा. राऊत यांनी या निवेदनाचे सुक्ष्मपणे वाचन करुन हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून याप्रकरणी नक्कीच अभ्यास करुन योग्य निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली.

यावेळी भगवान गायकवाड, किशोर अटकोरे, पद्माकर सोनकांबळे, माधव जाधव, राजीव कदम आदी उपस्थित होते.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !
नांदेड

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !

सर्व नागरीकांनी SIR ची प्रारूप मतदार यादी तपासावी- रामदास पाटील सुमठाणकर यांचे अवाहन
नांदेड

सर्व नागरीकांनी SIR ची प्रारूप मतदार यादी तपासावी- रामदास पाटील सुमठाणकर यांचे अवाहन

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !
देगलूर

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप
देगलूर

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप

ANCHOR AD SLOT