प्रजाशिल्प
search

रामदास पाटील यांच्या मध्यस्थीने निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मिटला !

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

रामदास पाटील यांच्या मध्यस्थीने निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मिटला !

मा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे अश्वासन ...

Prajashilp digital ,

देगलूरः येथून जवळच असलेल्या निपाणी सावरगाव येथे स्मशानभूमी नसल्यामुळे गेल्या काही दिवसापासून उपोषण सुरू होते ते उपोषण नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले आहे. मा. जिल्हाधिकारी , नांदेड यांनी उपोषणकर्त्यास अश्वस्त केले आहे की लवकरच स्मशानभूमी व इतर मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत .

शेत

गावातील स्मशानभूमीसाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे, अंत्यसंस्कारासाठी आवश्यक शेड, रस्ता, पाणी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आकाश कोकणे यांनी गेली अडीच वर्ष लढा दिला होता.मागील 6 दिवसापासून सरनावर बसून उपोषण सुरू करण्यात आले होते.


या वेळी काँग्रेस नेते मा. रामदास पाटील सुमठाणकर तालुका अध्येक्ष विष्णू पाटील, राजू कांबळे, विकास नरभागे, अनिल अखेमवार,प्रदीप वाघमारे सरपंच चैनपूर, तुकाराम पाटील कोकणे,उपोषण करते आकाश दत्ता पाटील कोकणे, तुकाराम पाटील कोकणे, दिगंबर नारायण राजाळे, माधव रामा वाघमारे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर बालाजी पाटील कोकणे, परमेश्वर कोकणे, नंदू कोकणेव समस्त गावकरी निपाणी सावरगाव त्रिनेत्र प्रबोधन’चे मुख्य संपादक वंकलवार प्रभू आणि कार्यकारी संपादक व आखिल भारतीय बहूजन ओबिसी अल्पसंख्यांक भ्रष्ट्राचार निर्मूल असोसिएशन देगलूर ता पूर्ण टिम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

“स्मशानभूमी हा राजकारणाचा नव्हे, तर प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवावे,” अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्डिले यांनी सदर प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.

parlor

यात जिल्हाधिकारी यांनी वेळ दिलेला आहे.तर तहसीलदार ,बिडिंओ व उपजिल्हाधिकार यांना आज रामदास पाटील यांनी फोन वर संवाद साधला होता.


उपोषण मागे घेण्यात आले असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार स्मशानभूमीचा प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लागावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. केवळ आश्वासन न देता आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.याच बरोबर कुरडगी,शेखपूर आणी इतर गावच्या स्म्शान भूमीच्या समस्या बद्दल पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.


Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

ना दहीहंडी, ना नाच ! सत्ता आली रंग उडाले !! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोर निरशा !!!
देगलूर

ना दहीहंडी, ना नाच ! सत्ता आली रंग उडाले !! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोर निरशा !!!

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप
देगलूर

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !
नांदेड

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !
देगलूर

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !

ANCHOR AD SLOT