प्रजाशिल्प
search

वर्गात चिमुकले जिवमूठीत घेऊन बसतात ; कावळगावच्या शाळेत !

Sandeep Subhashrao Bhutale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वर्गात चिमुकले जिवमूठीत घेऊन बसतात ; कावळगावच्या शाळेत !

छत गळते , भिंतीला मोठमोठ्या तडा साप, विषारी जीव - जंतूचा प्रादुर्भाव !

देगलूर येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्रा .शाळा कावळगाव येथील सर्व खोल्या थोड्याशा पावसाने गळत असून, शाळा पूर्णतः मोडकळीस आली आहे . याशिवाय या शाळेत जाण्यासाठी चिखलमय रस्त्यातूनच चिमुकल्यांना आपल्या शाळेत जावे लागते . त्यामुळे मौजे कावळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुरुस्त करण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळात चिमुकल्यांच जीवितहानी होण्याचा धोका बळावत आहे आणि यास शिक्षण प्रशासक सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन युवासेना चे मिलिंद कवळगावकर यांनी गटविकास अधिकारी यांना सादर केले आहे.

देगलूर पासून अत्यंत जवळ असलेले मौजे कावळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा थोड्याशा पावसाने सुद्धा पूर्णतः गळत आहे , छताला व वर्ग खोल्याला जागोजागी मोठमोठाल्या भेगा पडल्या असून त्यात विषारी साप, किडे - जीवजंतू मोठ्या प्रमाणात बसत आहेत . या ठिकाणी अनेकदा सूचना देऊन सुद्धा शिक्षण विभाग दूर्लक्ष करीत आहे.


parlor

मोजके चार ते पाच वर्ग खोल्या व छत पावसामुळे भेगा पडून गळत आहेत . शाळेमध्ये चिमूकल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अतिशय कठीण झाले आहे . त्यातच अती पाऊस झाल्यास वर्ग खोल्या पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविकास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही . याकरिता लवकरात लवकर खोल्यांचे पुनर्बांधणीकरण करण्यात येऊन विद्यार्थ्यांना दुखापत होणार नाही याची काळजी शिक्षण विभागाने घ्यावी तसेच, या शाळेसमोर असलेले उदगीर रोड ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत जाणारा सदरचा रस्ता हा अतिशय चिखलमय झाला असून त्यात जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत . पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून आजूबाजूला कमरे एवढे गवत वाढलेले असते त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येजा करण्यास हा त्रास सहन करावा लागतो . त्यामुळे या शाळेची पुनर्बांधाणी करण्यात येऊन या शाळेला येणारा रस्ता मजबूत करण्यात यावा व शाळेतील वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा युवा शिवसेनेच्या वतीने सदरीक शाळेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा मिलिंद कावळगावकर व नागेश इंगळे यांनी दिला आहे .


Sandeep Subhashrao Bhutale

Sandeep Subhashrao Bhutale

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'
गुन्हे

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'

धर्माबाद येथुन अनुदानित खताची अवैध वाहतूक उधळली
कृषि

धर्माबाद येथुन अनुदानित खताची अवैध वाहतूक उधळली

एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांना जिल्हा परिषदेत निरोप
राजकिय

एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांना जिल्हा परिषदेत निरोप

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शहर

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ANCHOR AD SLOT