प्रजाशिल्प
search

कायदा सर्वांचे संरक्षण करण्यास सक्षम - न्या. रवींद्र राठोड

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कायदा सर्वांचे संरक्षण करण्यास सक्षम - न्या. रवींद्र राठोड
“

मानव्य विकास विद्यालयात मेरा बचपन सुरक्षित बचपन अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

Prajashilp dijital,

देगलूर: जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. जीवनात कोणत्याही टप्यावर कोणत्याही संकटाला न घाबरता त्याचा सामना करा कारण कायदा सर्वांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे असे प्रतिपादन देगलूर दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र राठोड यांनी येथील मानव्य विकास विद्यालयात मेरा बचपन सुरक्षित बचपन अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात केले.

यावेळी नपा चे मुख्याधिकारी नीलम कांबळे,गटशिक्षणाधिकारी बालाजी गोडाजी, ॲड.रामराव नाईक,मुख्याध्यापक संतोष कोल्हे,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विरेंद्र पाटील, ॲड. पवार मॅडम, ॲड.पल्लवी कळसकर, ॲड. श्रद्धा हसनाळे, ॲड.अब्दुल रज्जाक, ॲड. योगेश्वर वरखिंडे, ॲड.अवधूत राजकुंटवार, ॲड. रुखसाना रज्जाक आदी उपस्थित होते.

यानंतर शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविक भाषणात ॲड.विलायत अली यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पॉक्सो कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली.

यानंतर ॲड.श्रद्धा हसनाळे यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणा बद्दल माहिती देऊन लहान बालकांवर होणाऱ्या अत्याचार व त्यापासून संरक्षण कसे मिळवावे याबद्दल सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक संतोष कोल्हे यांनी देगलूर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व सर्व टीम चे शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन शिवानंद स्वामी आणि ॲड.इनामदार यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे उपमुख्याध्यापक श्याम कोल्हे,पर्यवेक्षक शरद हांद्रे, प्रा.एस.पी.गाडवे,सुजित कांबळे,सौ. ललिता मोरे,श्रीमती मीना कनकदांडे,गिरीश पार्सेवार आदींनी परिश्रम घेतले.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव आनंदात साजरा
नांदेड

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव आनंदात साजरा

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!
देगलूर

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप
देगलूर

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन
देगलूर

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

ANCHOR AD SLOT