प्रजाशिल्प
search

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव आनंदात साजरा

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव आनंदात साजरा

Prajashilp digital,

देवलापार : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमटोला येथे मंगळवारी( ३ नोव्हेंबर) दिवाळीचे औचित्य साधून 'दीपावली निमित्त स्नेहभोजन' आणि 'भेटवस्तू वाटप' कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी केंद्रप्रमुख रोहित खापरे , केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल चोपडे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद कुमरे , शाळेचे मुख्याध्यापक प्रथमेश कुलकर्णी . तसेच इतर शिक्षक आणि गावातील नागरिक उपस्थित होते. शाळेच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त पाठबळ दिले.

दिवाळी सणाचा आनंद सर्व विद्यार्थ्यांना घेता यावा, या उद्देशाने शाळेत दिपावळी भोजन आयोजित करण्यात आले. यासोबतच, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुंदर भेटवस्तूंचे वाटप माननीय केंद्रप्रमुखांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित केंद्रप्रमुख रोहित खापरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "दिवाळी हा केवळ दिव्यांचा नव्हे, तर अज्ञानाचा अंधार दूर करून जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचा उत्सव आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची आणि देशाची प्रगती साधावी. पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात सुरक्षितपणे आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. तसेच, सणांचा आनंद घेण्यासोबतच दररोज वाचन-लेखन करून अभ्यासाचे सातत्य टिकवून ठेवावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे समारोपाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी केंद्रप्रमुख रोहित खापरे , केंद्रीय मुख्याध्यापक विठ्ठल चोपडे, शालेय समितीचे अध्यक्ष प्रमोद कुमरे व उपस्थीत ग्रामस्थांचे आभार मानले.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!
देगलूर

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप
देगलूर

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन
देगलूर

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

केतकी महाजनचे स्वप्न पूर्ण; एमबीबीएससाठी अमरावतीच्या GMC मध्ये निवड
देगलूर

केतकी महाजनचे स्वप्न पूर्ण; एमबीबीएससाठी अमरावतीच्या GMC मध्ये निवड

ANCHOR AD SLOT