प्रजाशिल्प
search

पिक विमा हप्ता व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन

Sandeep Subhashrao Bhutale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पिक विमा हप्ता व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन

PRAJASHILP digital

नांदेड :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 अंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता वगळता कोणतेही अतिरिक्त शुल्क ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) चालकांना देऊ नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्धापूर श्री. बिऱ्हाडे यांनी केले आहे.

dada


पीक विमा अर्ज भरण्याची सुविधा ग्राहक सेवा केंद्रामार्फत विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील काही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकांकडून प्रत्येक अर्जामागे सुमारे 100 रुपये नियमबाह्य शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत. शासनाने विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या सुविधेसाठी अतिरिक्त रक्कम आकारणे अयोग्य असून, शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही मागणीस बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

parlor

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 अंतर्गत पीक विमा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून, त्यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पीक विमा अर्ज भरण्यासाठी फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य आहे.

यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून अनेक भागात समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे. हवामान विभागाने पुढील काळातही कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, त्याचा परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम दिवसाची प्रतीक्षा न करता तातडीने पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे यांनी केले आहे.


Sandeep Subhashrao Bhutale

Sandeep Subhashrao Bhutale

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन
देगलूर

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

'दादां'च्या वाढदिवसानिमित्त 'जन्मदिन सोहळा'चे आयोजन
नांदेड

'दादां'च्या वाढदिवसानिमित्त 'जन्मदिन सोहळा'चे आयोजन

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शहर

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वर्गात चिमुकले जिवमूठीत घेऊन बसतात ; कावळगावच्या शाळेत !
परिसर

वर्गात चिमुकले जिवमूठीत घेऊन बसतात ; कावळगावच्या शाळेत !

ANCHOR AD SLOT