प्रजाशिल्प
search

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'

Sandeep Subhashrao Bhutale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'

PRAJASHILP digital

नांदेड :नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत 'जनसंवाद' उपक्रम सुरू केला आहे.


परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक हे प्रत्येक महिन्यास जिल्हा मुख्यालयांना भेटी देत असतात. यादरम्यान, त्या त्या जिल्ह्यातील तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या तक्रारी व अडीअडचणी समजावून घेऊन, त्या तत्परतेने सोडवण्याचा पोलीस उप महानिरीक्षक यांचा प्रयत्न आहे.


दिनांक 28 जुलै रोजी, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी, पोलीस अधीक्षक, नांदेड कार्यालयात जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतल्यानंतर, दुपारी 03.00 ते 05.00 या वेळेत जिल्ह्यातील तक्रारदारांशी 'संवाद' साधला. यादरम्यान, एकूण (17) तक्रारदारांनी आपले लिखित अर्ज पोलीस उप महानिरीक्षक यांना सोपविले. यात, मालमत्ता विषयक वाद, हरवलेले इसम, मारहाणी बाबत, दाखल गुन्ह्यांचा तपास इत्यादी तक्रारींचा समावेश आहे.


parlor

सदर दिवशी, प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन, त्यांच्या शिघ्र सोडवणुकीसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.


तक्रारदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या शिघ्र सोडवणुकीसाठी, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच 'संवेदना' ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. आज रोजी 'जनसंवाद' उपक्रमादरम्यान, प्राप्त झालेले सर्व अर्ज 'संवेदना' पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार असून, प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेण्यात येणार आहे.


याप्रसंगी, पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा व शहरातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे हजर होते.


Sandeep Subhashrao Bhutale

Sandeep Subhashrao Bhutale

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

धर्माबाद येथुन अनुदानित खताची अवैध वाहतूक उधळली
कृषि

धर्माबाद येथुन अनुदानित खताची अवैध वाहतूक उधळली

वर्गात चिमुकले जिवमूठीत घेऊन बसतात ; कावळगावच्या शाळेत !
परिसर

वर्गात चिमुकले जिवमूठीत घेऊन बसतात ; कावळगावच्या शाळेत !

एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांना जिल्हा परिषदेत निरोप
राजकिय

एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांना जिल्हा परिषदेत निरोप

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शहर

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ANCHOR AD SLOT