प्रजाशिल्प
search

गेल्या नऊ महिन्यापासून कुशल अकुशल कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनच नाही !

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

गेल्या नऊ महिन्यापासून कुशल अकुशल कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनच नाही !

अक्षरशः भीक मागून खायची वेळ;पालिका प्रशासन म्हणते काम करा नाहीतर . . . खुशाल जा . . .! बेकारी खूप आहे .

PRAJASHILP digital,

देगलूर : नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने कुशल-अकुशल कर्मचाऱ्यांची भरती ठेकेदारामार्फत करण्यात आली आहे.यामध्ये विज, पाणीपुरवठा, कार्यालयीन कामे, तत्सम काम व अधिकारी , नगराध्यक्ष - जनप्रतिनिधी ची चाकरी करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली .पण गेल्या नऊ महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही त्यामुळे त्यांच्यावर अक्षरश: भीक मागण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याविषयी प्रशासन ठेकेदाराकडे बोट दाखवत आहे तर ठेकेदार नगरपालिकेने बिल काढले नाही असे सांगून या कर्मचाऱ्यांची हेळसांड करीत आहेत.

शेत
आपल्या समस्या आणि प्रश्न घेऊन कुशल व अकुशल कंत्राटी कर्मचारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्याकडे गेले असता ते म्हणतात "बेकारी खूप वाढलेली आहे, तुम्हाला काम करायचे नसेल तर खुशाल निघून जा... तुमच्या ठिकाणी दुसरे कोणीतरी येईल आणि काम करेल" असे सांगत या कर्मचाऱ्यांना अक्षरशः हाकलून लावले आहे ज्या ठिकाणी काम करतोय त्याच ठिकाणी पैसा मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांना उधारी किंवा कर्ज काढून अक्षरश: भीक मागण्याची वेळ नऊ महिन्यापासून आली आहे.

देगलूर शहराच्या नगरपालिकेत कोणाचाही अंकुश राहिलेला नाही .जो तो आपल्या मर्जीप्रमाणे काम करीत आहे.जी मूलभूत कामे आहेत त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नगरपालिकेमध्ये सध्या तरी नाही यासाठी पालिका प्रशासन कंत्राट काढून ठेकेदारामार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करत आहे या भरतीमध्ये स्वच्छता कर्मचारी आणि कुशल व कुशल कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्यांची संख्या जवळपास 100 ते 120 आहे .याचे वेतन ठेकेदारामार्फत होत असते ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे या कर्मचाऱ्यांना वेतन देत असतो त्यामध्ये पीएफ व इतर सेवा ठेव सोडून त्याच्या हातात जेमतेम 9 ते 10 हजार रुपये टिकवित असतो याचे बिल पालिका प्रशासनातर्फे काढण्यात येते.

parlor

वास्तविकत: हा देगलूर शहरात लाईट, पाणीपुरवठा आणि इतर तत्सम कामासाठी या कुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांमार्फत सेवा पुरवण्यात येते. परंतु गेल्या नऊ महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना एक छदामही वेतन म्हणून देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आलेली आहे. ते पैसे मागण्यासाठी किंवा वेतन मागण्यासाठी ठेकेदाराकडे जातात , ठेकेदार म्हणतो पालिकेने बिल काढले नाही ; असे सांगताच ते मुख्याधिकारी यांच्याकडे जातात. मुख्याधिकारी सरळ त्यांचा अपमान करून त्यांना अक्षरशः हाकलून लावतात. या दोघांच्या मध्ये या कर्मचाऱ्यांची अतिशय हेळसांड होत असून त्यांना भीक मागण्या शिवाय आता पर्याय उरलेला नाही. आधीच कर्जबाजारी झालेल्या या कर्मचाऱ्यावर विनावेतन काम करण्यासाठी पुरेसे आर्थिक व मानसिक बळही उरलेले नाही.सदरील कर्मचारी नोकरीच्या नावाखाली हे पालिकेचे कर्मचारी, जनसेवक , नगराध्यक्ष यांची अक्षरशः चाकरी करीत असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक महिन्यापासून त्यांना वेतन नसल्याने नोकरी तरी कशी करावी ? असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला दिसून येतो .


Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

ना दहीहंडी, ना नाच ! सत्ता आली रंग उडाले !! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोर निरशा !!!
देगलूर

ना दहीहंडी, ना नाच ! सत्ता आली रंग उडाले !! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोर निरशा !!!

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप
देगलूर

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !
नांदेड

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !
देगलूर

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !

ANCHOR AD SLOT