प्रजाशिल्प
search

देगलूरमध्ये भाजपला मोठा धक्का; अशोक कांबळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

देगलूरमध्ये भाजपला मोठा धक्का; अशोक कांबळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!
“

आ. प्रतापराव पाटील चिखलीकरांचे खंदे समर्थक म्हणून सर्वपरिचित !

देगलूर :देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अत्यंत विश्वासू व खांदे समर्थक, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी युवा मोर्चा शहराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे यांनी आज अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

​नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. देगलूर-बिलोली विधानसभेचे लोकप्रिय नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या निवासस्थानी हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेठवार, माजी सनदी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार व बालाजी रोयलावार यांच्या प्रेरणेने संपन्न झाला.

पक्षप्रवेशानंतर बोलताना अशोक कांबळे यांनी सांगितले की, "काँग्रेस पक्षाची विचारसरणी आणि खासदार रवींद्र चव्हाण व रामदास पाटील सूमठानकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी काँग्रेस प्रवेश केला आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या विकासासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने कार्य करेन. या साठी मोगलाजी अण्णा, रामदास पाटील व अविनाश निलमवार यांचे सहकार्य अपेक्षित आहे ."


​यावेळी खासदार रवींद्र चव्हाण आणि नेते रामदास पाटील यांनी अशोक कांबळे यांचे काँग्रेस पक्षाचा तिरंगा रुमाल देऊन पक्षात शब्दसुमनांनी व उत्साहात स्वागत केले. अशोक कांबळे यांच्यासारख्या अभ्यासू आणि तळागाळातील कार्यकर्त्याच्या काँग्रेस प्रवेशामुळे देगलूर शहरातील राजकीय समीकरणे बदलणार असून, काँग्रेस पक्षाची ताकद अधिक भक्कम झाली आहे, असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.​या पक्षप्रवेश सोहळ्याला माझी उपनगराध्यक्ष बालाजी शेठ रोयलावार, तालुकाध्यक्ष विष्णुकांत पाटील ,सुनील मामा येशमवार,लक्ष्मण कंधारकर, हाफिज खान पठाण, नगरसेवक प्रतिनिधी इलियास भाई, आहत भाई, संजय जोशी, जिल्हा प्रवक्ता कैलास येसंगे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास नरबागे, एन.एस यु आय अध्यक्ष अमोल येशमवार, बंडू शिंदे , संजय मंगलावार, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अशोक कांबळे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक कांबळे यांच्या या निर्णयामुळे शहरात भाजपला मोठा हादरा बसला असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव आनंदात साजरा
नांदेड

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव आनंदात साजरा

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!
देगलूर

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप
देगलूर

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन
देगलूर

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

ANCHOR AD SLOT