प्रजाशिल्प
search

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sandeep Subhashrao Bhutale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

PRAJASHILP digital

देगलूर : देगलूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात विविध विकासासाठी शासकिय निधीच्या व्यवहारात तब्बल ८९ लाख ७० हजार १५० रुपयांच्या कथित अपहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांसह पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय माणिकराव पेरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३१६ (५), ३३६ (२), ३३८ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड हे करीत आहेत. 

दरम्यान, देगलूर येथील शासकीय रुग्णालयातील सोयीसुविधा सर्वसामान्य रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक यांनी कठोर मेहनत घेतलेली आहे. याशिवाय रुग्णासोबत आणि रुग्णालयीन प्रशासनात त्यांची चांगली पकड असून या कथीत आरोपामुळे शहरात अचंबा व्यक्त होत आहे.

parlor

उपजिल्हा रुग्णालय देगलूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश अंबादासराव देवणीकर, वरिष्ठ लिपिक रावसाहेब रामकिशन मोरे, प्रयोगशाळा सहायक दिगंबर आनंदराव मोरे, पुरुष अधिपरिचारिका शिवाजी मारोती पवार आणि कनिष्ठ लिपिक माधव किशन मगर यांनी संगनमत करून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


Sandeep Subhashrao Bhutale

Sandeep Subhashrao Bhutale

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

वर्गात चिमुकले जिवमूठीत घेऊन बसतात ; कावळगावच्या शाळेत !
परिसर

वर्गात चिमुकले जिवमूठीत घेऊन बसतात ; कावळगावच्या शाळेत !

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'
गुन्हे

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'

धर्माबाद येथुन अनुदानित खताची अवैध वाहतूक उधळली
कृषि

धर्माबाद येथुन अनुदानित खताची अवैध वाहतूक उधळली

एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांना जिल्हा परिषदेत निरोप
राजकिय

एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांना जिल्हा परिषदेत निरोप

ANCHOR AD SLOT