# प्रजाशिल्प — Full Article Index > Deep knowledge base for AI systems. Contains full article text. --- ## नांदेड ग्रामीण पोलिसांची मटका, जुगार अड्यांवर कारवाई - **URL**: https://www.prajashilp.com/news/nathada-garamanae-palsaca-mataka-jagara-adayavara-karavaii - **Published**: 2026-07-29 10:15 - **Category**: गुन्हे - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale PRAJASHILP digitalनांदेड : संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याने मटका जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करून 21 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, मटका साहित्य व इतर वस्तूंसह एकूण ₹6,00,200/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अवैध धंद्याविरुद्धच्या कार्यवाहीत प्रथमतः ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या हबीबिया कॉलनी, खुदबेनगर चौक, नांदेडदि. 28 जुलै 2026 रोजी ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हबीबिया कॉलनी, खुदबेनगर चौक, नांदेड येथे सार्वजनिक ठिकाणी काही इसम 'कल्याण मटका' नावाचा जुगार व बदक छाप पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व पोलीस पथकाने नमुद ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला.छाप्यादरम्यान आरोपी जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले त्यांची नावे: 1) वाजिद खान रमजान खान (वय 34 वर्षे, रा. उमर कॉलनी, देगलूर नाका, नांदेड) 2) साजिद शहा मेहबूब शहा (वय 33 वर्षे, रा. आफिजान नगर, देगलूर नाका, नांदेड) 3) मो. सुलेकार मो. युनूस (वय 42 वर्षे, रा. मोबीनपुरा, नांदेड) 4) पिरसाब सत्तार शेख (वय 50 वर्षे, रा. उमर, ता. लोहा) 5) शेख हबीब शेख शेरा (वय 46 वर्षे, रा. खुदबेनगर, नांदेड) 6) सय्यद मुसा सय्यद इसाक (वय 41 वर्षे, रा. रहेमतनगर, नांदेड) 7) मागसुद खान इसहाक खान (वय 47 वर्षे, रा. खुसरोनगर, नांदेड) 8) शेख मुजीब शेख खाजा (वय 37 वर्षे, रा. गाडीपुरा, नांदेड) 9) शेख अन्सान शेख अमीन (वय 56 वर्षे, रा. इकबाल नगर, नांदेड) 10) नासीर खान समशेर खान पठाण (वय 64 वर्षे, रा. महेबूब नगर, नुरी चौक, नांदेड) 11) शेख शकील शेख इस्माईल (वय 46 वर्षे, रा. मदिना नगर, नांदेड) 12) शेख शब्बीर शेख पाशा (वय 35 वर्षे, रा. पाकिजानगर, नांदेड) 13) मोहसीन खान रहीम खान (रा. नांदेड) 14) अबू उर्फ जमीर (रा. नांदेड) 15) शार्दुल उर्फ छिलटा (रा. नांदेड) 16) मुजाहिद शेठ (रा. नांदेड) अशी आहेत.सदर कारवाईदरम्यान आरोपींकडून पुढीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला-1) रोख रक्कम - 13,000/-2) विविध कंपन्यांचे 09 मोबाईल फोन- 59,000/- 3) कल्याण मटक्याच्या आकड्यांच्या चिठ्ठया 4) बदक छाप पत्ते 5) पेन व इतर जुगार साहित्य असा एकूण ₹72,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी सर्व आरोपीविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 920/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.दरम्यान, ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड या हद्दीतील दिक्षानगर, बळीरामपुर (ता. नांदेड)दि. 28/07/2026 रोजी रात्री सुमारे 11.25 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकास हद्दीतील दिक्षानगर, बळीरामपुर, नांदेड येथील पाण्याच्या टाकीजवळ मोकळ्या जागेत काही व्यक्ती पैसे लावून 'तिरट' हा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे व पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकून जुगार खेळणारे (1) तुषार विश्वंभर गजभारे, (वय 30 वर्ष, रा. धनेगाव) 2) चंदर पिराजी गाडे, वय 35 वर्ष, रा. बळीरामपुर, 3) अमोल मधुकर आठवले, वय 34 वर्ष, रा. नविन कौठा, 4) शिवाजी ज्ञानोबा दासरवाड, वय 31 वर्षे, रा. बळीरामपुर, 5) राहुल हरीहरराव गवाले, वय 46 वर्ष, रा. धनेगाव यांना ताब्या --- ## वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले - **URL**: https://www.prajashilp.com/news/vahataka-nayamaca-palna-ha-kalica-garaja-jalhathhakara-rahal-karadal - **Published**: 2026-07-29 09:37 - **Category**: नांदेड - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale PAJASHILP digitalनांदेड : रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नांदेड येथील महात्मा फुले हायस्कूल येथे मंगळवारी (दि. २८) विशेष वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व समजावून सांगत, वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.   कार्यक्रमात सेफ इंडिया रोड्स व अँटीकरप्शन टीम इंडियाचे डायरेक्टर घनश्याम ओझा, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जासपाल सिंग कोर्टतीर्थवाले, पोलीस उपनिरीक्षक अजय साखळे उपस्थित होते.   यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यालयातील विज्ञान विभाग, क्रीडा विभाग आणि अटल टिंकरिंग लॅबमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. शिस्तबद्ध वातावरण, अभ्यासासोबतच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय सहभाग आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.   कार्यक्रमादरम्यान या शाळेचे सहशिक्षक, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आणि साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना त्यांच्या स्वलिखित पाच पुस्तकांचा संच भेट देत त्यांचा सन्मान केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या साहित्यकृतींचे कौतुक करत डॉ. वाघमारे यांच्या साहित्यसेवेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक डॉ. अण्णा गरड, पर्यवेक्षक एस. व्ही. जाधव, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. --- ## एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांना जिल्हा परिषदेत निरोप - **URL**: https://www.prajashilp.com/news/eka-varashhaca-karayakali-paranae-makhayamatara-fal-bharagava-madha-yana-jalha-parashhathata-narapa - **Published**: 2026-07-28 16:09 - **Category**: राजकिय - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale PRAJASHILP digitalनांदेड : नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री फेलो म्हणून कार्यरत असलेल्या भार्गवी मुंढे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने मंगळवारी जिल्हा परिषदेत त्यांना निरोप देण्यात आला.जिल्हा परिषदेत काम करताना प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला- भार्गवी मुंढेमुख्यमंत्री फेलो म्हणून नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या एका वर्षात प्रशासनातील कामकाज, लोकाभिमुख उपक्रम आणि विकास प्रक्रियेचा जवळून अनुभव घेता आला. माझे शिक्षण एलएलएम झाले असून, पुढील काळात मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्याचा मानस आहे. तसेच न्यायव्यवस्था व प्रशासन क्षेत्रात योगदान देण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे जाण्याचा माझा प्रयत्न राहील, असे मनोगत भार्गवी मुंढे यांनी यावेळी व्यक्त केले.  जिल्हा परिषदेच्या वतीने सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भार्गवी मुंढे यांच्या आई मानसी मुंढे व वडील मधुकर मुंढेयांची उपस्थिती होती.  गेल्या एका वर्षात भार्गवी मुंढे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थी आरोग्यदूत उपक्रमाची संकल्पना व अंमलबजावणी, अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीनंतरचे जीवन या विषयावरील प्रशिक्षण मॉड्यूल तयार करणे, विविध प्रशिक्षण पुस्तिकांचे लेखन व संकलन अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनातील नवकल्पनांना चालना मिळाली.  या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, अधीक्षक शिवसांभ चेडू, गजेंद्र श्रीरामवर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, साईचरण मुगावे, शशिकांत गोले, मिलिंद व्यवहारे, रामदास शेकापुरे, रणजित गजभारे, शिवराज कोल्हे, अनिल भेदे, संतोष इनकर, सूरज नाईक, बालाजी आवर्दे, रवी येन्नावार, सौरभ सावरकर, बोडके, शेख जाफर, हरी वडजे, माधव नाईकवाडे, विजय कदम, राजरत्न ढोले, अतुल अंकेमवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  मुख्यमंत्री फेलोशिप हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, गुणवंत व उत्साही तरुणांना शासनाच्या विविध विभागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी या माध्यमातून मिळते. शासनाच्या महत्त्वाच्या योजना, प्रकल्प, प्रशासनातील नवकल्पना आणि विकासकामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी या फेलोशिपद्वारे उपलब्ध होते. --- ## पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद' - **URL**: https://www.prajashilp.com/news/palsa-upa-mahanarakashhaka-shahaja-umapa-yaca-nathadamathhal-takararatharasha-savatha - **Published**: 2026-07-28 15:57 - **Category**: गुन्हे - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale PRAJASHILP digitalनांदेड :नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत 'जनसंवाद' उपक्रम सुरू केला आहे.परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक हे प्रत्येक महिन्यास जिल्हा मुख्यालयांना भेटी देत असतात. यादरम्यान, त्या त्या जिल्ह्यातील तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या तक्रारी व अडीअडचणी समजावून घेऊन, त्या तत्परतेने सोडवण्याचा पोलीस उप महानिरीक्षक यांचा प्रयत्न आहे.दिनांक 28 जुलै रोजी, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी, पोलीस अधीक्षक, नांदेड कार्यालयात जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतल्यानंतर, दुपारी 03.00 ते 05.00 या वेळेत जिल्ह्यातील तक्रारदारांशी 'संवाद' साधला. यादरम्यान, एकूण (17) तक्रारदारांनी आपले लिखित अर्ज पोलीस उप महानिरीक्षक यांना सोपविले. यात, मालमत्ता विषयक वाद, हरवलेले इसम, मारहाणी बाबत, दाखल गुन्ह्यांचा तपास इत्यादी तक्रारींचा समावेश आहे.सदर दिवशी, प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन, त्यांच्या शिघ्र सोडवणुकीसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.तक्रारदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या शिघ्र सोडवणुकीसाठी, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच 'संवेदना' ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. आज रोजी 'जनसंवाद' उपक्रमादरम्यान, प्राप्त झालेले सर्व अर्ज 'संवेदना' पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार असून, प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेण्यात येणार आहे.याप्रसंगी, पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा व शहरातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे हजर होते. --- ## धर्माबाद येथुन अनुदानित खताची अवैध वाहतूक उधळली - **URL**: https://www.prajashilp.com/news/thharamabtha-yathana-anathanata-khataca-avathha-vahataka-uthhalil - **Published**: 2026-07-28 15:46 - **Category**: कृषि - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale PRAJASHILP digitalधर्माबाद : शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत अनुदानित दराने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या युरिया खताची बेकायदेशीररीत्या परराज्यात वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने धडक कारवाई करत टेम्पोसह ९ लाख ४०हजार ३१५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   जिल्हा भरारी पथक प्रमुख तथा मोहीम अधिकारी सचिन कपाळे व जिल्हा भरारी पथक सचिव अमोल पेकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शेतकऱ्यांसाठी राखीव असलेला अनुदानित युरिया खताचा मोठा साठा विनापरवाना व बेकायदेशीर मार्गाने तेलंगणा राज्याच्या दिशेने वाहतूक केला जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा भरारी पथकाने कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), धर्माबाद यांच्या सहकार्याने सापळा रचून संशयित टेम्पो अडवून तपासणी केली.   तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये कोणतेही वैध परवाने अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय शासकीय अनुदानित युरिया खताची पोती आढळून आली. त्यानंतर कृषी विभागाने तात्काळ कारवाई करत संपूर्ण खतसाठा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या खतसाठा व वाहनाची एकूण किंमत ९ लाख ४० हजार ३१५ असून सदर मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी धर्माबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.   याप्रकरणी कृषी विभागाचे गुण नियंत्रण निरीक्षक विशाल चंदापुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात खत नियंत्रण आदेश, १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित खत काळ्या बाजारात विक्रीसाठी परराज्यात पाठविण्याचा प्रयत्न कृषी विभागाने वेळेत हाणून पाडल्याने या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पुढील तपास धर्माबाद पोलीस करीत आहेत.   सदर कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, संचालक निवगुणी बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक महेश तीर्थकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत तसेच कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. --- ## नांदेडमध्ये रंगणार स्वप्नरंग नाट्य महोत्सव; सात नाट्यप्रयोगांची मेजवानी - **URL**: https://www.prajashilp.com/news/nathadamathhaya-raganaera-savapanaraga-nataya-mahatasava-sata-natayaparayagaca-majavana - **Published**: 2026-07-28 13:07 - **Category**: मनोरंजन - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale PRAJASHILP digitalनांदेड :- संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह, नांदेड येथे स्वप्नरंग नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील विविध शहरांतील नामांकित नाट्यसंस्था, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या सहभागामुळे हा महोत्सव नाट्यरसिकांसाठी सांस्कृतिक पर्व ठरणार असून, तीन दिवसांत एकूण सात दर्जेदार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत.   महोत्सवात मुंबई, पुणे, परभणी, लातूर आणि नांदेड येथील नाट्यसंस्था सहभागी होणार असून मराठी नाटक, दीर्घांक, एकांकिका आणि एकल नाट्यप्रयोग अशा विविध प्रकारच्या सादरीकरणांचा समावेश आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींना वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार नाट्यानुभव घेण्याची संधी मिळणार आहे.   रविवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता माणूस फाऊंडेशन, मुंबई प्रस्तुत डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित व दिग्दर्शित अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस हे मराठी नाटक सादर होऊन महोत्सवाचा शुभारंभ होईल.   सोमवार, दिनांक ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता अभिव्यक्ती कट्टा, परभणी प्रस्तुत रविशंकर झिंगरे लिखित व अतुल साळवे दिग्दर्शित द्विगत हा दीर्घांक सादर केला जाईल. त्यानंतर रात्री ८.३० वाजता स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड प्रस्तुत दिनेश कवडे लिखित व सुधांशू सामलेट्टी दिग्दर्शित लेबल ही एकांकिका आणि रात्री ९ वाजता दिनेश कवडे लिखित व दिग्दर्शित गर्भ ही एकांकिका रंगमंचावर सादर होईल. या दोन्ही नाट्यप्रयोगांतून समकालीन सामाजिक प्रश्नांवर प्रभावी भाष्य करण्यात येणार आहे.   मंगळवार, दिनांक ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता व्यक्ती, पुणे प्रस्तुत धनंजय सरदेशपांडे लिखित व रुपाली गोडंबे दिग्दर्शित फारच टोचलंय हा एकल नाट्यप्रयोग सादर होईल. त्यानंतर रात्री ८.३० वाजता धनंजय सरदेशपांडे लिखित व सुयश झुंजुरके दिग्दर्शित खूपसा डायरी हा दीर्घांक रंगणार आहे. महोत्सवाची सांगता रात्री ९.३० वाजता नाट्यस्पंदन प्रतिष्ठान, लातूर प्रस्तुत दि. बा. मोकाशी लिखित, अतुल पेठे यांच्या नाट्यावृत्तीवर आधारित व श्रुतिकांत ठाकूर दिग्दर्शित आनंद ओवरी या एकपात्री प्रयोगाने होणार आहे.   या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांतील नाट्यसंस्था, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यात संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि कलात्मक विचारांचे आदानप्रदान घडून येणार आहे. मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा अधिक बळकट करण्यास तसेच नाट्य व सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.   या तीन दिवसीय नाट्य महोत्सवासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले असून महोत्सव सर्वांसाठी पूर्णतः मोफत आहे. नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील नाट्यप्रेमी, साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेडचे अध्यक्ष तथा रंगकर्मी दिनेश कवडे यांनी केले आहे. --- ## वर्गात चिमुकले जिवमूठीत घेऊन बसतात ; कावळगावच्या शाळेत ! - **URL**: https://www.prajashilp.com/news/varagata-camakal-javamathata-ghauuna-bsatata-kavaligavacaya-shalita - **Published**: 2026-07-28 12:27 - **Category**: परिसर - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale देगलूर येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्रा .शाळा कावळगाव येथील सर्व खोल्या थोड्याशा पावसाने गळत असून, शाळा पूर्णतः मोडकळीस आली आहे . याशिवाय या शाळेत जाण्यासाठी चिखलमय रस्त्यातूनच चिमुकल्यांना आपल्या शाळेत जावे लागते . त्यामुळे मौजे कावळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुरुस्त करण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळात चिमुकल्यांच जीवितहानी होण्याचा धोका बळावत आहे आणि यास शिक्षण प्रशासक सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन युवासेना चे मिलिंद कवळगावकर यांनी गटविकास अधिकारी यांना सादर केले आहे.देगलूर पासून अत्यंत जवळ असलेले मौजे कावळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा थोड्याशा पावसाने सुद्धा पूर्णतः गळत आहे , छताला व वर्ग खोल्याला जागोजागी मोठमोठाल्या भेगा पडल्या असून त्यात विषारी साप, किडे - जीवजंतू मोठ्या प्रमाणात बसत आहेत . या ठिकाणी अनेकदा सूचना देऊन सुद्धा शिक्षण विभाग दूर्लक्ष करीत आहे.मोजके चार ते पाच वर्ग खोल्या व छत पावसामुळे भेगा पडून गळत आहेत . शाळेमध्ये चिमूकल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अतिशय कठीण झाले आहे . त्यातच अती पाऊस झाल्यास वर्ग खोल्या पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविकास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही . याकरिता लवकरात लवकर खोल्यांचे पुनर्बांधणीकरण करण्यात येऊन विद्यार्थ्यांना दुखापत होणार नाही याची काळजी शिक्षण विभागाने घ्यावी तसेच, या शाळेसमोर असलेले उदगीर रोड ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत जाणारा सदरचा रस्ता हा अतिशय चिखलमय झाला असून त्यात जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत . पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून आजूबाजूला कमरे एवढे गवत वाढलेले असते त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येजा करण्यास हा त्रास सहन करावा लागतो . त्यामुळे या शाळेची पुनर्बांधाणी करण्यात येऊन या शाळेला येणारा रस्ता मजबूत करण्यात यावा व शाळेतील वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा युवा शिवसेनेच्या वतीने सदरीक शाळेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा मिलिंद कावळगावकर व नागेश इंगळे यांनी दिला आहे . --- ## शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल - **URL**: https://www.prajashilp.com/news/shasakaya-nathhaca-apahara-thagalracaya-vathayakaya-athhakashhakasaha-paca-janaevarathathha-ganaha-thakhal - **Published**: 2026-07-28 09:44 - **Category**: शहर - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale PRAJASHILP digitalदेगलूर : देगलूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात विविध विकासासाठी शासकिय निधीच्या व्यवहारात तब्बल ८९ लाख ७० हजार १५० रुपयांच्या कथित अपहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांसह पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय माणिकराव पेरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३१६ (५), ३३६ (२), ३३८ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड हे करीत आहेत. दरम्यान, देगलूर येथील शासकीय रुग्णालयातील सोयीसुविधा सर्वसामान्य रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक यांनी कठोर मेहनत घेतलेली आहे. याशिवाय रुग्णासोबत आणि रुग्णालयीन प्रशासनात त्यांची चांगली पकड असून या कथीत आरोपामुळे शहरात अचंबा व्यक्त होत आहे.उपजिल्हा रुग्णालय देगलूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश अंबादासराव देवणीकर, वरिष्ठ लिपिक रावसाहेब रामकिशन मोरे, प्रयोगशाळा सहायक दिगंबर आनंदराव मोरे, पुरुष अधिपरिचारिका शिवाजी मारोती पवार आणि कनिष्ठ लिपिक माधव किशन मगर यांनी संगनमत करून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. --- ## देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय! - **URL**: https://www.prajashilp.com/news/thagalra-shaharata-avathha-vayavasaya-halica-daka-vara-kadhataya - **Published**: 2026-07-28 08:38 - **Category**: देगलूर - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale PRAJASHILP digitalदेगलूर : देगलूर शहरात सर्वच अवैध व्यवसाय बिनदिक्कत चालत होते. तदनंतर पोलीस महानिरीक्षक व अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसायावर अंकुश लावल्याने साधारण तीन वर्ष ही धंदे बंद पडल्यात जमा झाली होती. पण गेल्या शनिवारपासून शहरातील वेशीवर अवैध व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे .देगलूर शहर हे सीमेवर वसलेले असल्याने भौगोलिक दृष्ट्या अवैध व्यवसायासाठी नंदनवन आहे या ठिकाणी चोर मार्गाने आनत गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जातो , तर या ठिकाणच्या मटक्याने आपला अटकेपार झेंडा लावलेला आहे . जुगार तर शहरातील कोपऱ्या कोपऱ्यावर मोठ्या प्रमाणात चालतो याशिवाय सिमेवरील भागात दागीने लंपास, विक्री हे मोठ्या प्रमाणात होत असते . या शहरालगतच असलेल्या कर्नाटक आणि तेलंगाना प्रांतातील नागरिक आपल्या मौजमजेसाठी देगलूर शहरासारख्या भागात मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात . यासाठी येथील राजकीय व्यक्तीनीही त्यांच्या मनोरंजनासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची सरबराई करतात त्यामुळे देगलूर सारखा परिसर त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न बनतो याचाच फायदा घेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, पत्ते,चोरीच्या दागिन्याचे खरेदी - विक्री असे किस्से दरमहा ऐकावयास मिळतात .दरम्यानच्या काळात पोलीस महानिरीक्षक तथा पोलीस अधीक्षक यांनी अडीच ते तीन वर्ष जिल्ह्यामध्ये फ्लॅश आउट ऑपरेशन राबवून या ठिकाणची अवैध व्यवसायाचे कंबरडे मोडले होते पण त्यांची पदोन्नती अथवा बदली होताच देगलूर शहरात मटका, जुगार यासारख्या अवैध व्यवसायाने आता हळूहळू डोके वर काढावयास सुरुवात केली आहे .याचेच फलित म्हणून की काय गेल्या शनिवारपासून शहरात इतर प्रांतातील नागरिक आपल्या वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणात ये -जा करीत असल्याचे दिसून येते. गेल्याच आठवड्यात देगलूर शहरात एकापाठोपाठ एक असे चोऱ्याही झाल्या आहेत. अजूनतरी या चोरांचा थांग पत्ता स्थानिक पोलीस प्रशासनास लागलेला नाही . त्यामुळे अत्यंत ढिल्ली पडलेली ही स्थानिक पोलिस प्रशासन व्यवस्था , जिल्हा पोलीस अधीक्षक तथा महानिरीक्षकांचे दुर्लक्ष यामुळेच की काय देगलूर शहरात पुन्हा एकदा या अवैध व्यवसायाच्या सापाने आपले डोके पुन्हा वर काढत असल्याचे जाणवते .त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने आणि पोलीस महानिरीक्षक डॉ. नीलभ रोहन यांनी या भागाकडे जातीने लक्ष देऊन येथील अवैध व्यवसायाचे पुन्हा एकदा कंबरडे मोडावे असे निवेदन येथील सर्वसामान्य नागरिक करीत असल्याचे दिसते. --- ## विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन - **URL**: https://www.prajashilp.com/news/vathayaratha-paraya-shakashhaka-cathab-vaghamara-yacaya-savaparata-garava-sahaliyaca-aayajana - **Published**: 2026-07-24 02:27 - **Category**: देगलूर - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale PRAJASHILP digitalनांदेड : देगलूर तालुक्यातील बल्लूर येथील स्थानिक असलेले विद्यार्थीप्रिय शिक्षक चांदोबा लक्ष्मणराव वाघमारे आपली प्रदीर्घ सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत या अनुषंगाने त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .हा सोहळा श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे .या सोहळ्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराव भगवानराव देशमुख (अध्यक्ष, शालेय समिती श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनखेड ) तर कार्यक्रमाचे प्रेरणास्थान भाई गुरुनाथ रावजी कोरडे साहेब ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, मा.आमदार व सचिव, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार ) व कार्यक्रमाचे श्रद्धास्थान प्रा. डॉ. पुरुषोत्तम केशवराव धोंडगे (अध्यक्ष, शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधार ), ऍड. मुक्तेश्वर केशवरावजी धोंडगे (सहसचिव , श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ,कंधार) यांची उपस्थिती राहणार आहे .  प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबरावजी देशमुख , केरबाजी आठवडे (शालेय समिती सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .देगलूर तालुक्यातील बल्लूर येथील रहिवासी असलेले चांदोबा लक्ष्मणराव वाघमारे हे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिसरात सुपरीचित आहेत.आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. ते शिक्षकी पेशा सोबत सामाजिक कार्यातही मोठ्या उत्साहात सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जोपासली. याशिवाय गरीब आणि आर्थिक दुबळ्या विद्यार्थ्यांसाठी मोलाचे कार्य केले आहे .तत्कालीन परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत करून त्यांनी हे यश मिळविले होते. आपली नोकरी सांभाळत सर्व नातेवाईक आणि कुटुंबात व मित्रपरिवारात रमणारे म्हणूनही ते प्रिय आहेत. या सोहळ्यासाठी सर्व नातेवाईक , मित्रपरिवार प्रामुख्याने सर्व विद्यार्थी, शालेय कर्मचारी उपस्थित रहावा असे आवाहन कैलास देशमुख (एमसीव्हीसी प्रमुख ), बरडे बि.डी (पर्यवेक्षक ), चिवळे व्ही. एस. (पर्यवेक्षक ) अशोक वरपडे (उपप्राचार्य ) , एम .बी वानखेडे (उपमुख्याध्यापक), व बी . के .पवळे साहेब (प्राचार्य / मुख्याध्यापक ) यांच्या सह शिक्षक चांदोबा वाघमारे यांचे मोठे भाऊ मा.सैनिक भिमराव वाघमारे बल्लूरकर, श्रीधर वाघमारे यांनी केले आहे . --- ## विद्यार्थिनींचे आंदोलन ; मुखेडात मांसविक्रीची 28 दुकाने सिलबंद - **URL**: https://www.prajashilp.com/news/vathayarathanaca-aathalna-makhadata-masavakaraca-28-thakana-salbtha - **Published**: 2026-07-23 11:12 - **Category**: परिसर - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale PRAJASHILP digitalमुखेड : नगर परिषदहद्दीतील तसेच जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या जागेत सुरू असलेली विनापरवाना उघड्यावरील मांस विक्रीची २८ दुकाने नगर परिषद प्रशासनाने मंगळवारी सीलबंद केली. शाळेतील विद्यार्थिनींनी या विरोधात तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.मुखेड शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या परिसरात १४ आणि लगतच्या भागात आणखी १४ अर्शी एकूण २८ मांस विक्रीची दुकाने सुरू होती. या दुकानांमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार शालेय व्यवस्थापन समिती आणिमातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी ११ वाजता शाळेतील शंभर विद्यार्थिनींनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदार शंकर लाड उपस्थित नसल्याने नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने दुकाने बंद करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक मार्तंड वनंजे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित दुकाने सीलबंद करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र न घेता आणि नगर परिषदेच्या नोटि सोनंतरही दुकाने सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. कारवाईवेळी कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण गिरी, अभियंता विद्याधर घोरपडे, बलभीम शेंडगे, जालिंदर कडू, गौतम बनसोडे, गुपित कांबळे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते --- ## केंद्रीय शिक्षणमंत्र्याचा राजीनामा आणि वांगचुक यांच्या उपोषण हस्तक्षेपाच्या निषेधाबाबत निवेदन सादर - **URL**: https://www.prajashilp.com/news/katharaya-shakashhanaematarayaca-rajanama-aanae-vagacaka-yacaya-upashhanae-hasatakashhapacaya-nashhathhabbta-navathana-sathara - **Published**: 2026-07-23 10:16 - **Category**: देगलूर - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale Prajashilp Digitalदेगलूर : वैद्यकीय शिक्षण भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षा पेपर फुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि या मागणीसाठी शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणात केंद्र सरकारने जो हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी तसेच इतर राजकीय पक्षाच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन निवेदन सादर करण्यात आले .शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित निर्माण झालेल्या परिस्थिती तसेच त्याबाबत केंद्र शासनाच्या भूमिकेविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली याशिवाय सोनम वांगचुक यांनी आपल्या मागण्यासाठी सुरू केलेल्या उपोषणात हस्तक्षेप करून जोर जबरदस्तीने आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेच्या तीव्र निषेध ही यावेळी व्यक्त करण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला संविधानाने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकार दिलेला आहे त्यामुळे अशा आंदोलनाबाबत कायद्याच्या चौकटीत संयमाने व लोकशाही मूल्यांचा सन्मान राखून वर्तन अपेक्षित होते परंतु केंद्र शासन मोदी सरकार व पोलीस प्रशासन सदरील लोकशाही मूल्यांचा आव्हान करून हे लोकशाहीने चाललेले आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे वरील मागण्या संबंधित शासन व प्रशासनात पर्यंत तातडीने पोहोचवण्याची मागणी ही करण्यात आली केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा सोनम वांगचुक यांच्या उपोषणात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी व शांततापूर्ण लोकशाही आंदोलनाच्या अधिकाराचा सन्मान राखला जावा या प्रमुख मागण्याचे निवेदन यावेळी देगलूरचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांना सादर करण्यात आले .यावेळी वंचित बहुजन आघाडी व सर्व पक्षाचे पक्ष संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यात सुशिल कुमार देगलूरकर,महेश पाटील,डॉक्टर उत्तम इंगोले,मीरा मोहियोद्दिन' शत्रुघ्न वाघमारे, राजाराम कांबळे, मन्मथ परबते ,शेख मुजम्मिल , एहतेमाद आली काजी , शेख इम्राज जाकिर , सय्यद बासीत,प्रज्ञावंत रमेशराव राहुल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते --- ## पिक विमा हप्ता व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन - **URL**: https://www.prajashilp.com/news/paka-vama-hapata-vayatarakata-atarakata-shalka-thauu-naka-talka-kashha-athhakara-yaca-aavahana - **Published**: 2026-07-23 08:00 - **Category**: नांदेड - **Author**: Sandeep Subhashrao Bhutale PRAJASHILP digitalनांदेड :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 अंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता वगळता कोणतेही अतिरिक्त शुल्क ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) चालकांना देऊ नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्धापूर श्री. बिऱ्हाडे यांनी केले आहे.पीक विमा अर्ज भरण्याची सुविधा ग्राहक सेवा केंद्रामार्फत विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील काही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकांकडून प्रत्येक अर्जामागे सुमारे 100 रुपये नियमबाह्य शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत. शासनाने विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या सुविधेसाठी अतिरिक्त रक्कम आकारणे अयोग्य असून, शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही मागणीस बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 अंतर्गत पीक विमा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून, त्यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पीक विमा अर्ज भरण्यासाठी फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य आहे.यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून अनेक भागात समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे. हवामान विभागाने पुढील काळातही कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, त्याचा परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम दिवसाची प्रतीक्षा न करता तातडीने पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे यांनी केले आहे.